मा. खासदार / मा. आमदारांसाठी “महावितरण कृषी योजना २०२०” मोबाइलॲपचा वापर करून कृषी ग्राहकांसाठी नवीन विदयुत पायाभूत सुविधांची आवश्यकता / विद्यमान विदयुत पायाभूत सुविधांच्या क्षमता वृद्धीची सुविधा उपलब्ध आहे .
मा. खासदार / मा. आमदार “महावितरण कृषी योजना २०२०” मोबाईलॲपवर ओटीपी आधारित लॉग इन करू शकतात.
मा. खासदार / मा. आमदार कृषी ग्राहकांसाठी नवीन विदयुत पायाभूत सुविधांची आवश्यकता/ विद्यमान विदयुत पायाभूत सुविधांच्या क्षमता वृद्धीची मागणी सबमिट करू शकतात
नवीन उपकेंद्र
उपकेंद्रामधील विद्यमान पॉवर रोहित्राची क्षमता वाढविणे
नवीन वितरण रोहित्र
विद्यमान वितरण रोहित्राची क्षमता वाढविणे
उच्च दाब वाहिनी
लघु दाब वाहिनी
मा. खासदार / मा. आमदार त्यांच्या द्वारे दाखल केलेल्या विद्यमान पायाभूत सुविधांच्या विनंत्या पाहू शकतात. तसेच कृषी योजना २०२० अंतर्गत झालेली त्यांचा कार्यक्षेत्रातील कृषी ग्राहक थकबाकी व वसुलीची माहिती मोबाइलॲप व योजनेच्या डॅशबोर्ड वर बघू शकता.