ग्रामपंचायतींना प्रोत्साहन
-
विद्युत अधिनियम - २००३ च्या तरतुदीनुसार ग्रामीण भागात ‘मायक्रोफ्रेंचायझी’ तयार करून याद्वारे वीजबिल (चालू / थकीत) वसुलीसाठी सहभागी ग्रामपंचायतीला भरघोस प्रोत्साहन.
-
वसुलीसाठी सर्व इच्छुक ग्रामपंचायती (ज्या ग्रामपंचायती ग्रामसभेचा ठराव करतील) सोबत करार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.
-
ग्रामपंचायतीला प्रस्तावित मोबदला खालीलप्रमाणे राहील
-
वीज बिल भरणा केंद्र म्हणून प्रती वीजबिल वसुलीसाठी रु.५/- निश्चित.
-
थकबाकी वसूल केल्यास, वसूल केलेला थकबाकीच्या ३०%
-
चालू वीजबिल वसूल केल्यास, वसुली रकमेच्या २०%
-
ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीकडे कृषीग्राहकांसोबतच इतर ग्राहकांकडील वीजबिल वसुलीची कामे देण्याचेही प्रस्तावित आहे. अकृषक ग्राहकांकडील थकबाकीमधून ग्रामपंचायतीद्वारे वाढीव वसुलीक्षमतेच्या वसुलीवरील २० टक्के मोबदला तसेच चालू बिलांच्या वसुलीसाठी वाढीव वसुलीचा स्लॅबनिहाय मोबदला खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे.
-
मागील आर्थिक वर्षातील सरासरी वसुलीची कार्यक्षमता |
ग्रामपंचायतीने प्राप्त केलेल्या वसुलीची कार्यक्षमता |
फरक C = (B-A) |
फरकातील प्रोत्साहन (वाढीव वसुली क्षमतेच्या) |
A |
B |
C |
D |
० - ५० टक्के |
|
|
२० टक्के |
५० - ७५ टक्के |
|
|
१५ टक्के |
७५ टक्के पेक्षा जास्त |
|
|
१० टक्के |
-
गाव पातळीवर सहकारी संस्था, महिला बचत गट, “महिलांचा स्वयं सहाय्यता गट” (Women's SHGs) इत्यादींची “वीज देयक संकलक एजन्सी” (Electricity Bill Collection Agency) म्हणून नेमणूक करण्यात येईल व त्यांनादेखील वरील प्रोत्साहन उपलब्ध असेल.
उर्जामित्रांना (ग्राम विद्युत व्यवस्थापक) प्रोत्साहन
कृषी ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सदर योजनेच्या व्यापक यशासाठी ग्रामस्तरावरील उर्जामित्रांचा सहभाग देखील अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने,
-
ज्याठिकाणी वीज बिल वसुली ग्राम पंचायत किंवा रोहित्र स्तरावर कार्यरत नाही त्याठिकाणी त्यांनी वसूल केलेल्या चालू बिलाच्या रक्कमेतून ५% व थकबाकी रक्कमेच्या वसुलीच्या १०% रक्कम उर्जामित्रांना प्रोत्साहन पर रक्कम देण्यात येईल. तसेच, जिल्हास्तरावर आवंटीत केलेल्या निधीमधून ग्रामपंचायत स्तरावरील उदा. कृषी सहाय्यक, कोतवाल इत्यादी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर ५ टक्क्यांपर्यंत रक्कम देऊ शकतील.
-
ज्याठिकाणी ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येणाऱ्या वीजबिल वसुलीमध्ये महावितरणचा जनमित्र उपलब्ध नाही त्याठिकाणी उर्जामित्रांचा सहभाग असणार हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीद्वारे वसूल करण्यात आलेपया वीजबिल वसुलीपैकी १ टक्के रक्कम ही संबंधित उर्जामित्रांना प्रोत्साहनपर देय राहील.
शेतकरी सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांना प्रोत्साहन
-
कृषीपंप ग्राहकांची थकबाकीची रक्कम वसूल केल्यास शेतकरी सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांना वसूल केलेल्या रक्कमेच्या 10 टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल
कृषी धोरण
ग्राहकांच्या माहितीसाठी –
- कृषी वीज धोरण - २०२० योजनेअंतर्गत ग्राहकाने भरणा केलेल्या रकमेपैकी ३३% रक्कम हि ग्राहकाच्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.
- तसेच, ग्राहकाच्या भरणा रकमेपैकी आणखी ३३% रक्कम हि ग्राहकाच्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.
कृषी धोरण २०२० साठी मसुदा करार डाउनलोड करा :