भागधारकांसाठी प्रमुख प्रोत्साहने |
- लवकर कार्यान्वित होणार्या प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार (PPA) कालावधी हा पूर्वमान्य (deemed extension) असेल
- हरित उपकर निधीमधून रु. २५ लाख प्रति सबस्टेशन इतके एकरकमी अनुदान
- खाजगी जमीन मालक आणि शेतकर्यांसाठी रु. १,२५,००० प्रति हेक्टरी प्रमाणे जमीन भाडेपट्टी, वार्षिक ३% दरवाढीसह
- स्थानिक ग्रामपंचायतीसाठी रु. ५ लाख प्रति वर्ष प्रमाणे तीन वर्षांसाठी प्रोत्साहनपर अनुदान
- ११ केव्ही आणि ३३ केव्ही वर जोडलेल्या सौर प्रकल्पांना अनुक्रमे २५ पैसे प्रति युनिट आणि १५ पैसे प्रति युनिट प्रमाणे तीन वर्षांसाठी अनुदान
- हंगामी वीज निर्मितीच्या निर्देशकांनुसार deemed generation साठी 100% प्रचलित दर लागू
- एका पेक्षा जास्त प्रकल्पांसाठी सामायिक Evacuation वाहिनीची तरतूद
|
नाविन्यपूर्ण व्यवहार संरचना |
- महसुली जमिनीसाठी स्वतंत्र कंपनी (SPV)
- खाजगी आणि महसुली जमिनीचे एकत्रीकरण
- बॅक-टू-बॅक लीज-सबलीज; PPA-PSA व्यवस्था
- कार्यक्रमासाठी समर्पित नोडल एजन्सी
|
योजना जोखीम मुक्त करण्यासाठी उपाय |
- डेटा-रूम, GIS स्तरावर जमिनीचा तपशील
- एक खिडकी मंजुरी यंत्रणा
- कृषी वापरावर आधारित प्रकल्प क्षमता निर्धारित; CFA चा लाभ घेण्यासाठी ह्या योजनेतील वीज प्रकल्प KUSUM - C योजनेशी संलग्नित
- देयक सुरक्षा निधी (Revolving Fund), लेटर ऑफ क्रेडिट (LC)
|