मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत माहिती
लाभार्थी सेवा टॅब अंतर्गत उपलब्ध सेवा:
- ऑनलाइन अर्ज ही लिंक वापरून लाभार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- अर्जाची स्थिती / भरणा ही लिंक वापरून लाभार्थी त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एस.एम.एस. द्वारे प्राप्त झालेल्या लाभार्थी क्रमांकाच्या मदतीने त्याच्या अर्जाच्या सद्यस्थितीचा मागोवा घेऊ शकतो.
- लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “फर्म कोटेशन यशस्वी” असेल तर लाभार्थी अर्जाची स्थिती / भरणा ही लिंक वापरून ऑनलाइन भरणा किंवा महावितरण संकलन केंद्राद्वारे भरणा करण्यास पात्र आहे.
- फर्म कोटेशनच्या ऑनलाइन भरणा करण्यासाठी इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट्स, कॅश कार्ड्स, यूपीआय सारखे पर्याय आहेत.
- जर अर्जाची स्थिती / भरणा ह्या लिंकवर; लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “भरणा यशस्वी“ असेल तर पुरवठादार बटण सक्रिय केले जाईल व ओटीपी आधारित सिस्टम वापरुन उपलब्ध निवडसूचीतील पुरवठादार निवडता येईल.
- पंप पुरवठादार निवडतांना जर कोणताही निवडसूचीतील पुरवठादार उपलब्ध नसल्यास, त्या मंडळासाठी त्या क्षमतेच्या पम्पाची निर्धारित केलेली संख्या शिल्लक नाही, असा संदेश लाभार्थीला दिसेल.
- ऑन होल्ड दस्तऐवज पुन्हा अपलोड करा: लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती शोधताना; जर लाभार्थीसाठी सद्यस्थिती “ए 1 फॉर्म सबमिट केलेला आहे” असेल तर अर्जाची सद्यस्थिती टॅब खाली अपलोड दस्तऐवज टॅब दिसेल व लाभार्थ्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त झालेल्या एस.एम.एस. नुसार दस्तऐवज पुन्हा-अपलोड करावे लागतील.
- जर अर्जाची स्थिती / भरणा ह्या लिंकवर; लाभार्थीच्या अर्जाची सद्यस्थिती “संयुक्त सर्वेक्षण नंतर नकार “असेल तर कोटेशनची रक्कम परत मिळविण्यासाठी बँकेच्या तपशीलांसह बँक विवरण गोळा केले जाईल उदा. खाते क्रमांक, बँक आयएफएससी कोड. बँक विवरण ओटीपी आधारित प्रणाली वापरुन लाभार्थ्यांकडून गोळा केले जाईल.
लाभार्थीसाठी उपलब्ध इतर सेवाः
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत सर्व प्रमुख टप्प्यांसाठी लाभार्थीला त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएस पाठविला जातो आणि त्याच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर ई-मेल पाठविला जातो.
- नोंदणीकृत मोबाइल नंबरमध्ये बदल करावयाचा असल्यास (ए 1 फॉर्म भरताना भरलेला ) संबंधित मंडळाच्या अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधावा.
- 3. तक्रार नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेः तक्रार निवारण कॉल सेंटर नंबर 18001023435/18002333435 वर कॉल करा किंवा agsolar@mahadiscom.in. वर ई-मेल पाठवा.
- लाभार्थी महावितरण मोबाइल अॅपद्वारे अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो. एक वेगळा टॅब ऑफ-ग्रिड सोलर अॅग्री पंप स्टेटस आहे जेथे लाभार्थी अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकतो .
- जर एखाद्या अर्जाची सध्याची स्थिती “ए 1 फॉर्म नाकारला आहे” असेल तर अस्वीकार करण्याचे कारण देखील नमूद केलेले असते.