केंद्रिय ऊर्जा मंत्रालयाने (MoP)दिनांक २२.०७.२०१९ च्या अधिसूचनेद्वारे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान योजना (पीएम कुसुम) च्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
महाराष्ट्रातील कृषि /बिगर कृषी वाहिनीचा विद्युत भार पुर्ण करण्यासाठी महावितरण अंतर्गत कुसुम घटक-अ योजनेमध्ये इच्छुक शेतकरी/सहकारी संस्था /पंचायत/ फार्मर्स प्रोडयूसर ऑर्गनाझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA)---- सौर ऊर्जा विकासक (SPG) संबोधले जाईल
कृषि ग्राहकांना ८ तासाकरीता दिवसा वीज पुरवठा.
शेतकऱ्यांना नापिक व बिगर शेतजमीनीचा वापर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी करुन त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ.
कृषी ग्राहक सबसिडीचा भार कमी करणे.
पारेषण प्रणालीची बचत.
विकेंद्रीत सौर प्रकल्पाद्वारे वहन् आणि वितरण हानीत बचत.
शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA), हे कमीत कमी ०.५ मे.वॅ. ते २ मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्प/संयंत्राची अभियांत्रिकी, उत्पादन, पुरवठा उभारणी, चाचणी आणि सौर प्रकल्प यांची रचना करेल जे ५०० मे.वॅ.च्या संचयी क्षमतेसह निरनिराळया ठिकाणी नापीक/ बिनशेती जमीन किंवा लागवडीयोग्य जमीन असल्यास, प्रकल्प् स्टिल्टसवर स्थापित केले जातील. प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल २५ वर्षाच्या कालावधीसाठी राहील.
शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मर्स प्रोडयूसर ऑर्गनाझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA)जर सौर ऊर्जा प्रकल्प् विकसित करण्यासाठी आवश्यक समभागाची व्य्वस्था करण्यास सक्षम नसल्यास ते भाडे तत्वावर जमीन देऊन विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याचा पर्याय निवडू शकतात. मासिक वीज भाडे देय सौर ऊर्जा विकासक (SPG) द्वारे उत्पन्न केलेल्या ऊर्जा बिलाच्या चलनातून वजा केले जाईल आणि महावितरणद्वारे शेतकऱ्यांना थेट बचत खात्यात दिले जाईल.
शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मरर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA) उपलब्ध् जमिनीचा पूर्व व्यवहार्यता पार पाडतील आणि बॅकबेल डीपीआर, आर्थिक मॉडेल तयार करतील आणि प्रकल्पासंबंधीत सर्व परवानग्या मिळवतील.
शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मरर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA)----- (सौर ऊर्जा विकासक (SPG) संबोधले जाईल) हे जमिनीचा विकास, सर्वेक्षण, भूगर्भीय माती चाचणी, साईटवर जाणारा रस्ता बांधणे, जमिनीवर कुंपण यासारखी सर्व पायाभूत कामे करतील. वीज निष्कासन, ग्रिड कनेक्टिव्हिटी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इतर सर्व संबंधित कामे त्यांच्या स्वखर्चाने करतील.
कमाल वीज दर रू ३.१० प्रती युनिट राहील. यशस्वी निविदाकार/ विकासक आणि महावितरण दरम्यान २५ वर्षासाठी वीज खरेदी करार केला जाईल.
शेतकरी/सहकारी संस्था/पंचायत/ फार्मरर्स प्रोडयूसर ऑर्गनायझेशन (FPO) /वॉटर युझर्स असोसिएशन (WUA)----- (सौर ऊर्जा विकासक (SPG) संबोधले जाईल) यांच्यासाठी कोणतेही अर्थिक निकष नाहीत. तथापि विकासकाला या योजनेअंतर्गत भाग घेण्याकरीता पुढील अटी बंधनकारक राहतील.
नापरतावा प्रोसेसिंग फी ५००० रुपये प्रति मे.वॅ.
वर्षिक निव्व्ळ मुल्य् – रु.१ कोटी प्रति मे.वॅ.
वार्षिक उलाढाल - रु. २५ लाख प्रति मे.वॅ.
बयाना रक्क्म (ई.एम.डी.): रु.१ लाख प्रति मे.वॅ.
एखादया विकासकाला एका विशिष्ट उपकेंद्रासाठी एकापेक्षा अधिक अर्ज करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
सौर ऊर्जा विकासक त्याच उपकेंद्रासाठी दुसऱ्या निविदांमार्फत अभिव्यक्ति स्वारस्य सूचना (ईओआय) दाखल केलेले आढळल्यास त्याचे ईओआय देखील अपात्र ठरवले जाईल.
एलओए (LOA) जारी केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत वीज खरेदी करार करण्यात येईल.
वीज खरेदी करारानुसार विकासकाकडून संपूर्ण वीज महावितरणास विकत घेणे बंधनकारक असेल.
किमान १५% CUF बंधनकारक.
महावितरणतर्फे LC आणि Escrow ची व्यवस्था ठेवली जाईल.
बँक हमीच्या स्वरुपात ईएमडी रु.१ लाख/ मे.वॅ.
PBG परफॉर्मन्स बँक गँरंटीची वैधता : एलओए (LoA) जारी केल्याच्या तारखेपासून १२ महिने.
अयशस्वी विकासकाला ईएमडी परत करणे : निवडलेल्या विकासकाला एलओए (LoA) जारी केल्यापासून १५ दिवसाच्या आत.
सद्यस्थितीतील एमएनआरई/बीआयएसच्या मापदंडानुसार सौर उपकरणे, इनव्हर्टर, बीओएस आणि इतर उपकरणे यांना बंधनकारक असतील.