लकी डिजिटल ग्राहक योजना

महावितरणच्या LT Live ग्रहांकांसाठी लकी ड्रॉ योजना

(तीन मासिक लकी ड्रॉ)

ऑनलाईन वीज देयक भरा

आणि जिंका

३००० पेक्षा अधिक बक्षिसे

योजनेचे तपशील :

  1. तीन मासिक लकी ड्रॉ योजना-उपविभाग स्तरावर
  2. योजनेच्या कालावधीत सलग मागील तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यांपासून ऑनलाइन पद्धतीने पैसे भरणाऱ्या आणि रु.१०/- पेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी
  3. योजनेचा कालावधी: पाच महिने (०१.०१.२०२५ ते ३१.०५.२०२५ पर्यंत)
  4. एप्रिल-२०२५, मे-२०२५ आणि जून-२०२५ मध्ये अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा लकी ड्रॉ काढण्यात येईल.
  5. सदर योजने अंतर्गत लकी ड्रॉ ऑनलाइन पद्धतीने काढला जाईल.
  6. बक्षिसे:
    बक्षिसे प्रत्येक लकी ड्रॉसाठी बक्षिसे प्रत्येक लकी ड्रॉसाठी विजेत्यांची संख्या प्रतीक्षा यादी
    प्रथम स्मार्ट फोन प्रत्येक बक्षिसासाठी दोन ग्राहक
    दुसरे स्मार्ट फोन
    तिसरे स्मार्ट घड्याळ

पात्रता अटी:

  1. ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीजग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.
  2. सदर योजना सार्वजनिक पाणीपुरवठा आणि पथ दिवे श्रेणीतील ग्राहकांना, तसेच फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहकांना लागू राहणार नाही.
  3. ग्राहकास योजनेच्या कालावधीत ऑनलाइन भरणा पर्याय (नेट बॅकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, NACH, क्यूआर कोड, NEFT, RTGS इ.) वापरून सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने भरणा करणे आवश्यक राहील.
  4. लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिन्यात, दरमहा एक असे, ऑनलाईन भरणा पर्याय वापरून देयक अदा करणे आवश्यक राहील.
  5. दरमहा वीज देयक भरणा किमान रक्कम रु. १००/- असणे आवश्यक आहे.
  6. ज्या महिन्यामध्ये लकी ड्रॉ घोषित केला जाईल,त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम रु.१०/-पेक्षा कमी असावी.
  7. योजनेच्या कालावधीत ग्राहक /ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असेल.

योजनेला लागू अटी व शती:

  1. सदर योजना महावितरणच्या वतीने ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे. सदर योजना कोणत्याही प्रकारचे जुगार किंवा तत्सम गोष्टींना पाठिंबा / प्रोत्साहन देत नाही.
  2. सदर योजना सर्व ग्राहकांना विजेते बनवण्याची हमी देत नाही. सदर योजने अंतर्गत विजेत्यांच्या निवडीसाठी पारदर्शक संगणकीय पद्धतीने याद्रीच्छिक क्रमांक निवड प्रक्रिया (computerised random number selection process) वापरली जाईल.
  3. सदर योजने बाबत ग्राहकांना जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले जातील परंतु महावितरण प्रत्येक ग्राहकाशी थेट संवाद साधण्याची हमी देत नाही. सदर योजनेच्या प्रसिद्धी साठी महावितरणकडून विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले जातील जसे कि, महावितरणच्या वेबसाइट वर, वर्तमान पत्रांद्वारे , ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर संदेश इत्यादी.
  4. महावितरणकडे उपलब्ध डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ग्राहकांना संपर्क / सूचित केले जाईल. विजेत्या ग्राहकाकडून १० दिवसांच्या आत प्रतिसाद न दिल्यास, सोडतीच्या प्रतिक्षा यादीत निवडलेल्या ग्राहक क्रमांकांना बक्षीस वाटप कारणेबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील,/ असेल.
  5. अकस्मात घटना घडल्यास (जसे की आग, पूर, संप, युद्ध, वैधानिक आवश्यकता इत्यादींसह परंतु इतकेच मर्यादित नाही.) सदरचा लकी ड्रॉ निलंबित कारणेबाबतचा निर्णय पूर्णपणे महावितरणच्या अखत्यारीत राहील/ असेल आणि कोणताही विजेता ग्राहक अशा बक्षीसावर दावा करू शकत नाही.
  6. विजेत्याने ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा जसे की आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज देयक व देयक भरणा केल्याची प्रत सादर करणे आवश्यक आहे.
  7. भाषांतरित आवृत्ती मधील एखादया अटी व शर्तीच्या अर्थाबाबतीत विवाद असल्यास इंग्रजी अवृत्ती ग्राह्य धरण्यात येईल.
  8. सविस्तर अटी आणि शर्तीसाठी महावितरणच्या संकेत स्थळावर भेट द्या – www.mahadiscom.in

Urja
Empowering the Consumer