महावितरण अभय योजना २०२४ (पीडी ऍम्नेस्टी योजना २०२४) मध्ये आपले स्वागत आहे.
पात्रतेचे निकष :
दिनांक ३१.०३.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्चदाब व लघुदाब ग्राहक (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक वगळून) या योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील.
योजनेचा कालावधी - १ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५.
ग्राहकांनी देय असलेल्या रकमेतून १००% विलंब आकार आणि व्याज माफ केले जाईल आणि १००% मुळ थकबाकी रक्कम भरल्यानंतर कायमस्वरूपी (PD) वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम १००% एकरकमी भरण्याचा किंवा किमान ३०% डाऊनपेमेंटसह जास्तीत जास्त ०६ हफ्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
उच्चदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर ५% अतिरिक्त सवलत मिळेल तसेच लघुदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर १०% अतिरिक्त सवलत मिळेल.