वीज बिलाबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मा. वीज नियामक आयोगाने २६ मार्च २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक निर्देशानुसार , “वीज वितरण परवानाधारक कंपन्या त्यांच्या आवश्यक सेवा वगळता इतर सेवा स्थगित करू शकतात जसे मीटर रिडिंग, वीज बिल वाटप, बिल भरणा केंद्रावर ऑफलाइन बिल संकलन, नवीन कनेक्शन देणे इ. साठी ग्राहकांना वैयक्तिक भेट घेणे, वगैरे. ”

सदर मार्गदर्शक सूचनांनुसार, लॉकडाउन कालावधीत कोणत्याही ग्राहकांचे मीटर रीडिंग घेतले नाही आणि लॉकडाऊन पूर्वीच्या मागील ३ महिन्यांच्या वास्तविक वापरावर आधारित सरासरी युनिट्सवर वीज बिले दिली गेली. हा सरासरी कालावधी हिवाळ्याचा होता पण एप्रिल, मे आणि जून महिन्यांचा कालावधी उन्हाळ्याचा कालावधी असतो आणि म्हणूनच या कालावधीत सर्वसाधारणपणे वीज वापर इतर महिन्यांपेक्षा जास्त असतो.

जून-२० महिन्यात महावितरणने घेतलेल्या प्रत्यक्ष मीटर रीडिंग नुसार वीज बिले दिली आहेत. प्रत्येक बिलात मासिक आधारावर स्थिर आकार आकारला जातो म्हणून सदर स्थिर आकार आणि त्यावरील विद्युत शुल्क वगळता मागील दोन महिन्यांत देण्यात आलेल्या सरासरी बिलाची रक्कम महावितरणने समायोजित केली आहे.

आपण आपल्या वीज बिलाचा सविस्तर तपशील https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंक वर पडताळून पाहू शकता.

जर काही कारणामुळे ग्राहकांचे मीटर रीडिंग होऊ शकले नाही तर यापूर्वीच्या ३ महिन्यांच्या प्रत्यक्ष मीटर रीडिंग वर आधारित वापराची सरासरी म्हणजेच सरासरी युनिट्स होय.

जर काही कारणास्तव आपल्या मीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग करणे शक्य झाले नाही, तर चालू महिन्यासाठी सरासरी बिल पाठविले जाते. यावेळी मीटर रीडर कडून मीटरची सद्यस्थिती नोंद केली जाते.

सरासरी वीज बिलांवर दर्शविलेली मीटरची सद्यस्थिती खालीलप्रमाणे असू शकते.

  1. फॉल्टी: जर मीटर सदोष / कार्यरत नसल्याचे आढळले तर
  2. लॉक: मीटर रीडिंग करताना ग्राहक परिसर लॉक केलेला आढळला तर
  3. मीटर चेंज : मीटर बदलले परंतु नवीन मीटरचा तपशील सिस्टममध्ये उपलब्ध नाही
  4. इनअक्सेसिबल : जर मीटरचे पॅनेल स्पष्ट दिसत नसेल तर
  5. आर. एन. टी. (रीडिंग घेतले नाही): मीटर रीडरने रीडिंग घेतले नाही

कोविड -19 साथीच्या रोगासंदर्भात एमईआरसीने दिलेल्या सावधगिरीच्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचनांनुसार, मीटर रीडिंग, चाचणी, बिल वितरण, उपविभागीय कार्यालये ज्यात मानवी संवादांची, प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता असते अश्या उपक्रम बंद करण्यात आले आणि केवळ वीजपुरवठा संबंधित आवश्यक सेवा कार्यरत सुरू आहेत. या परिस्थितीमुळे व प्राप्त निर्देशानुसार माहे एप्रिल व मे-२० मध्ये सर्व ग्राहकांना सरासरी बिले दिली गेली. परंतु, मिशन बिगिन अगैन सुरू झाल्यानंतर माहे जून-२० पासून महावितरणने जिल्हा प्रशासनाच्या पूर्व परवानगीने रेड झोन / कंटेनमेंट क्षेत्र वगळता इतर ठिकाणी ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यास सुरूवात केली.

आपण आपले मीटर रीडिंग महावितरण मोबाईल अॅप द्वारे किंवा पोर्टलद्वारे पाठवू शकता. महावितरणने प्रत्येक ग्राहकांच्या मीटर रीडिंगसाठी नियोजित तारीख निश्चित केली आहे. सेल्फ रीडिंग पाठविण्याची सुविधा मीटर रीडिंगच्या निर्धारित तारखेच्या 5 दिवस आधी सुरू होते. प्रत्येक ग्राहकांना विनंती एसएमएस पाठवला जातो की दिलेल्या तारखेपर्यंत स्वत: चे रीडिंग पाठवावे.

a) महावितरण ऍपद्वारे सेल्फ रीडिंग सबमिशन :

  1. आपण नोंदणीकृत वापरकर्ता असल्यास महावितरण ऍपवर लॉग इन करा
  2. मुख्य मेनू वर सबमिट रीडिंग पर्याय निवडा

महावितरण मोबाईल ऍप

Google Play वर ते मिळवा
App Store वर डाउनलोड करा

सेल्फ रीडिंग सबमिशन हा पर्याय अतिथी वापरकर्त्यांसाठी देखील नोंदणीशिवाय उपलब्ध आहे. येथे आपल्याला आपला ग्राहक क्रमांक आणि मीटर क्रमांक नमूद करावा लागेल.

b) ग्राहक पोर्टलद्वारे स्वयं रीडिंग सबमिशन :

  1. महावितरण वेबसाइट वर जा
    www.mahadiscom.in -> ग्राहक पोर्टल -> द्रुत एक्सेस -> ग्राहक वेब सेल्फ सर्व्हिस -> सेल्फ रीडिंग
  2. वेब सेल्फ सेवेवर लॉग इन करा
    ग्राहक क्रमांक निवडा आणि ‘सबमिट रीडिंग’ दाबा

ग्राहक नोंदणीसाठी कृपया येथे क्लिक करा

LT I Res 1-Phase स्थिर आकार ०-१०० युनिट्स १०१-३०० युनिट्स ३०१-५०० युनिट्स ५०१-१००० युनिट्स >१००० युनिट्स
टॅरिफ ३१.०३.२०२० पर्यंत ₹९० ₹३.०५/unit ₹६.९५/unit ₹९.९/unit ₹११.५/unit ₹१२.५/unit
टॅरिफ ०१.०४.२०२० पासून ₹१०० ₹३.४६/unit ₹७.४३/unit ₹१०.३२/unit ₹११.७१/unit ₹११.७१/unit
महानगरपालिका क्षेत्रातील लघुदाब घरगुती ग्राहकांना कनेक्शनसाठी दरमहा ₹१० अतिरिक्त स्थिर आकार आकारले जाईल
१०KW पेक्षा जास्त जोडभार असल्यास पुढील प्रत्येक १०KW भारासाठी ₹१८५ चे अतिरिक्त स्थिर आकार तीन फेज ग्राहकांना लागू असेल.

मार्च २०२० मध्ये घरगुती ग्राहकांसाठी इंधन दर समायोजन (इंधन समायोजन आकार): १ ते १०० युनिट्ससाठी रू. ०.५०, १०१ ते ३०० युनिट्ससाठी ०.८४ रुपये, ३०१ ते ५०० युनिट्ससाठी रू. १.०७, ५०० ते १००० युनिट्ससाठी रू. १.१९ आणि त्याहून अधिक १००० युनिट्स ₹१.२६.

इंधन समायोजन आकार मे-२०, जून-२० आणि जुलै-२० साठी शून्य आहे.

खाली एक उदाहरण दिले आहे:

ग्राहक क्र. ????????????
वीजदर : ०९० / LT-I (B) Residential 1 Ph
बिल महिना एप्रिल २० मे २० जून २०
मागील रीडिंग १२२६३ १२२६३ १२२६३
मागील रीडिंग तारीख ०३-०३-२० १८-०४-२० ०३-०३-२०
चालू रीडिंग आर.एन.ए आर.एन.ए १२५७०
चालू रीडिंग तारीख ०३-०६-२०
युनिट्स ३३ ३३ ३०७
मीटरची सद्यस्थिती आर.एन.ए आर.एन.ए नॉर्मल
बिल कालावधी (महिन्यात) ३.०७
A) स्थिर आकार (दरमहा) ₹९०.०० ₹११०.०० ₹११०.००
A) स्थिर आकार (दरमहा)
एप्रिल २० मे २० जून २०
दरमहा ₹९० ₹११० ₹११०
B) वीज आकार ₹१००.६५ ₹११४.१८ ₹१०२७.१७
B) वीज आकार
एप्रिल २० मे २० जून २०
युनिट्स ३३ ३३ ३०७
दर ₹३.०५ ₹३.४६ तपशीलांसाठी खालील चार्ट पहा
रक्कम ₹१००.६५ ₹११४.१८
बिल कालावधी : ३.०७ महिने / जुन्या युनिट्स ३१-०३-२०२० पर्यंत = ९५
वीज आकार जून २०
बिल कालावधी (महिन्यात) ०.९४ पहिला स्लॅब १०० युनिट्स ३१ दिवस साठी.
म्हणून ९४ युनिट्स २९ दिवस साठी (०३-०३ ते ३१-०३ = २९ दिवस)
युनिट्स दर रक्कम
जुन्या
पहिला स्लॅब (२९*१००/३१) ९४ ₹३.०५ ₹२८६.७०
दुसरा स्लॅब ₹६.९५ ₹६.९५
एकूण (जुन्या) ९५ युनिट्स ₹२९३.६५
नवीन
पहिला स्लॅब २१२ ₹३.४६ ₹७३३.५२
एकूण (नवीन) २१२ युनिट्स ₹७३३.५२
एकूण ऊर्जा शुल्क (जुन्या + नवीन) ३०७ युनिट्स ₹१०२७.१७
C) वहन आकार (प्रति युनिट) ₹४२.२४ ₹४७.८५ ₹४२९.००
C) वहन आकार (प्रति युनिट)
एप्रिल २० मे २० जून २०
जुन्या युनिट्स चालू वर्ष एकूण
युनिट्स ३३ ३३ ९५ २१२ ३०७
दर प्रति युनिट ₹१.२८ ₹१.४५ ₹१.२८ ₹१.४५
एकूण ₹४२.२४ ₹४७.८५ ₹१२१.६ ₹३०७.४ ₹४२९
D) इंधन समायोजन आकार (स्लॅबनिहाय) ₹१६.५० ₹०.०० ₹०.००
D) इंधन समायोजन आकार (स्लॅबनिहाय)
एप्रिल २० मे २० जून २०
जुन्या युनिट्स चालू वर्ष एकूण
युनिट्स ३३ ३३ ९५ २१२ ३०७
दर प्रति युनिट ₹०.५ ₹० ₹० ₹०
एकूण ₹१६.५ ₹० ₹० ₹० ₹०
E) वीज शुल्क : (A+B+C+D) च्या १६% ₹३९.९० ₹४३.५२ ₹२५०.५९
E) वीज शुल्क : (A+B+C+D) च्या १६%
एप्रिल २० मे २० जून २०
A) स्थिर आकार (दरमहा) ₹९०.०० ₹११०.०० ₹११०.००
B) वीज आकार ₹१००.६५ ₹११४.१८ ₹२१४.८३
C) वहन आकार (प्रति युनिट) ₹४२.२४ ₹४७.८५ ₹९०.०९
D) इंधन समायोजन आकार ₹१६.५० ₹०.०० ₹१६.५०
एकूण ₹२४९.३९ ₹२७२.०३ ₹१५६६.१७
१६% of एकूण ₹३९.९० ₹४३.५२ ₹२५०.५९
F) वीज विक्री कर ₹०.०० ₹०.०० ₹०.००

घरगुती ग्राहकांकरिता लागू नाही

G) वजा सरासरी देयकाची रक्कम ₹०.०० ₹०.०० ₹३७२.८५
G) वजा सरासरी देयकाची रक्कम
एप्रिल २० मे २० जून २०
B) वीज आकार ₹१००.६५ ₹११४.१८ ₹२१४.८३
C) वहन आकार (प्रति युनिट) ₹४२.२४ ₹४७.८५ ₹९०.०९
D) इंधन समायोजन आकार ₹१६.५० ₹०.०० ₹१६.५०
वीज शुल्क : (B+C+D) च्या १६% ₹२५.९२ ₹२५.९२ ₹५१.४३
एकूण ₹१८४.९१ ₹१८७.९५ ₹३७२.८५
H) व्याज ₹०.०० ₹०.०० ₹०.००
I) इतर आकार ₹०.०० ₹०.०० ₹०.००
चालू वीज देयक (₹) बेरीज (A+B+C+D+E+F+H+I-G) ₹२८९.२९ ₹३१५.५५ ₹१४४३.९१

वीजदराच्या तपशीलवार अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

उच्चदाब आणि लघुदाब टॅरिफच्या सारांश वरील प्रेस नोट येथे वाचा

आपण आपला मोबाइल नंबर किंवा ईमेल महावितरण कडे नोंदविला असेल तर आपल्याला एसएमएसद्वारे किंवा आपल्या मेल आयडीवर आपल्या बिलाचा तपशील मिळेल. आपण महावितरण ऍपचा वापर करून किंवा खालील लिंक वर क्लिक करून आपले बिल डाउनलोड करु शकताः
https://wss.mahadiscom.in/wss/wss_view_pay_bill.aspx

आपण बिलिंग व देय तपशील पहाण्यासाठी महावितरण वेबसाइट www.mahadiscom.in -> ग्राहक पोर्टल -> ‘ऑनलाईन बिल पाहणे व भरणा’ वर क्लीक करुन आपल्या वीज बिलाचा सविस्तर तपशील पाहू शकता तसेच वीजबिल डाऊनलोड करू शकता.

  1. आपले लॉकडाऊन नंतरचे प्रत्यक्ष मीटर वाचनानुसार आलेले जून -२० चे वीज देयक, देय तारखे पर्यंत (थकबाकीसह) भरल्यास, चालू बिलाच्या रकमेवर २% सवलत पुढील महिन्यांच्या बिलात म्हणजे जुलै-२० बिलात जमा होईल.
  2. जर आपल्याला जून-२० मधील बिलाची रक्कम एकरकमी भरू शकत नसाल तर आपण महावितरणने जाहीर केल्यानुसार आपले वीज बिल तीन समान मासिक हफ्त्यात भरल्यास आपले जून-२० च्या बिलावर व्याज व विलंब शुल्क लागणार नाही. त्यासाठी माहे जून-२० च्या बिलातील १/३ रक्कम जून-२० च्या देय तारखेच्या आधी, पुढील १/३ रक्कम, जुलै -२० च्या चालू बिलासहित देय तारखेपूर्वी व त्यापुढील १/३ रक्कम ऑगस्ट -२० च्या चालू बिलासाहित ऑगस्ट-२० च्या देय दिनांकापुर्वी भरावी लागेल.
  3. यासाठी तुम्हाला पूर्व परवानगीसाठी कोणत्याही महावितरण कार्यालयात जाण्याची गरज नाही. आपण याप्रमाणे बिलाचा हफ्ता महावितरणच्या कोणत्याही वीजबिल भरणा केंद्रावर किंवा ऑनलाइन पेमेंट चॅनेलद्वारे थेट भरू शकता.
  4. जर आपले वीज बिल लॉकडाऊन नंतर जून-२० एवजी माहे जुलै-२० मध्ये प्रत्यक्ष मीटर वाचनानुसार आले असेल तर वरील योजना माहे जुलै-२० च्या देयकासाठी लागू असेल. माहे जुलै-२० ची हफ्त्याने भरावयाची रक्कम माहे जुलै-२०, ऑगस्ट-२० व सप्टेंबर-२० मध्ये वरीलप्रमाणे भरू शकता.

ग्राहक महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रावर आपले वीजबिल भरू शकतात. या भरणा केंद्रांमध्ये विभागीय भरणा केंद्रे, डीसीसी बँका, खाजगी संकलन केंद्रे इत्यादींचा समावेश आहे.

या संकलन केंद्राशिवाय महावितरण ऍप व ग्राहक पोर्टलवर ऑनलाइन पेमेंट करू शकतात. ऑनलाईन पेमेंट्ससाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश कार्ड्स, नेटबँकिंग, वॉलेट्स, यूपीआय अशा विविध प्रकारच्या पेमेंट्सची निवड करू शकता.

लघुदाब ग्राहक युपीआयमार्फत ऑनलाईन पेमेंटसाठी बिलावर छापलेला यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करु शकतात.

ग्राहकांना बिलाच्या तपशिलासाठी एसएमएस पाठविला जातो, त्यामध्ये बिले पहाण्यासाठी व देयक भरण्यासाठी लिंक देण्यात येते. एसएमएसमध्ये या लिंकवर क्लिक केल्यानंतर, ग्राहक बिलाचे तपशील पाहू शकतात, बिल पीडीएफ डाउनलोड करू शकतात आणि बिलाचे ऑनलाइन पेमेंट करू शकतात.

सर्व उच्चदाब ग्राहक, लघुदाब ग्राहक (२० kw पेक्षा अधिक वीजभार असलेले) आणि निवासी संस्था / निवासी वसाहतीमधील कॉमन कनेक्शन साठी महावितरणने आरटीजीएसद्वारे वीजबिल भरणा करण्याची सुविधा दिली आहे. त्यासाठी अशा ग्राहकांनी वीजबिलावर दिलेल्या आरटीजीएस खात्यावर भरणा करणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्राहकाचा आरटीजीएस खाते क्रमांक वेगळा आहे.

Urja
Empowering the Consumer