श्री. विजय सिंघल (भा.प्र.से.)

null

व्यवस्थापकीय संचालक

                 महावितरणच्या अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार श्री.विजय सिंघल यांनी ०१ फेब्रुवारी २०२१ रोजी स्वीकारला आहे. या नियुक्तीपूर्वी त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. श्री.विजय सिंघल हे १९९७ च्या तुकडीचे IAS(भाप्रसे) अधिकारी आहेत. आयआयटी रुरकी मधून त्यांनी बी.टेक(स्थापत्य अभियांत्रिकी) या विषयात गोल्ड मेडल मिळवले आहे. याचबरोबर आयआयटी दिल्ली मधून ‘बिल्डींग साइंस अँड कंसट्रक्शन मॅनेजमेंट’(इमारत विज्ञान आणि बांधकाम व्यवस्थापण) या विषयात एम.टेक पदवी संपादित केली आहे.

                 श्री.विजय सिंघल यांना “उत्कृष्ट लोक प्रशासनाकरता” मानाच्या अशा ‘पंतप्रधान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील ‘नद्याजोड प्रकल्पा’साठी २००९ साली मा.पंतप्रधान यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला आहे. ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे आयोजित ९ व्या आंतरराष्ट्ट्रीय नदी परिसंवाद व आंतरराष्ट्ट्रीय नदी परिषदेमध्ये त्यांनी ‘जळगाव जिल्ह्यातील नद्या जोडणी प्रकल्प’ या विषयावर व्याख्यान दिले आहे. / सादरीकरण केले आहे. “न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटी आल्बेनी, युएसए” व “पेनिसेल्व्हिया युनिव्हर्सिटी, पेन्ना स्टेट, युएसए” या विद्यापीठात त्यांना नद्याजोड प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

                 याचबरोबर ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत मुंबई शहरास ‘भारतातील सर्वात स्वच्छ राज्याची राजधानी’ बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची नोंद घेत भारताचे पंतप्रधान मा.ना.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते ‘पंतप्रधान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे. साखर आयुक्तालयात साखर आयुक्त म्हणून कार्यरत असताना श्री.विजय सिंघल यांना उत्कृष्ट ई-गव्हर्नंसच्या अंमलबजावणीकरता महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते रौप्य व कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेत केलेल्या तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी मा.ना.श्री.रवी शंकर प्रसाद, इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते २०१८ साली ‘डिजिटल इंडिया अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे.

Urja
Empowering the Consumer