पायाभुत आराखडा प्रकल्पांची प्रमुख उद्दिष्टे :
- ग्राहकांना अखंडीत व दर्जेदारवीज पुरवठा करणे
- वीज मागणीनुसार वीज पुरवठा करणे
- वीज वितरण हानी कमी होणे
- रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होणे.
उपरोक्त सर्व 120 प्रकल्पांना महाराष्ट्र राज्या वीज नियामक आयोगाची तज्वत: मंजूरी प्राप्त(रु. 9013.95 कोटी) [जोड पत्र 1]
उपरोक्त 120 प्रकल्पांना खालील प्रमाणे अर्थसहाय्य मंजूर
- ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ -42 प्रकल्प (रु. 2632.60 कोटी)
- पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन -76 प्रकल्प (रु. 4813.71 कोटी)
- रायगड जिल्हा सहकारी बँक -2 प्रकल्प (रु. 235 कोटी)
एकूण अर्थसहाय्य मंजूर -120 प्रकल्प (रु. 7681.31 कोटी)
प्रकल्पाची सद्यस्थिती :
टप्पा क्र. 1 – या अंतर्गत एकूण 37 प्रकल्पांसाठी रु. 3057.18 कोटी खर्चाच्या 17 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी 25 प्रकल्पांच्या कामासाठी (रु .2442.83 कोटी) 11 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 2]
टप्पा क्र. 2 – या अंतर्गत एकूण 88 प्रकल्पांसाठी रु. 6718.61 कोटी खर्चाच्या 53 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी 61 प्रकल्पांच्या कामासाठी (रु .5816.53 कोटी) 38 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 3]
टप्पा क्र.2(अ) – या अंतर्गत एकूण 35 प्रकल्पांसाठी रु. 2565.66 कोटी खर्चाच्या 33 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी 28 प्रकल्पांच्या कामासाठी (रु .2250.67 कोटी) 27 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 4]
टप्पा क्र.2(ब) – यामधे विविध क्षमतेची एच.टी. कॅप्यासिटर्स (स्टेशन टाईप), संलग्न उपकरणे व साहित्य यांचा पुरवठा, वाहातूक, बांधणी, उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी रु. 45.74 कोटीचे कंत्राट दिलेले आहे व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत [जोड पत्र 5]
टप्पा क्र.4 – या अंतर्गत एकूण 3 प्रकल्पांसाठी रु. 159.76 कोटी खर्चाच्या 3 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी तीनही प्रकल्पांच्या कामासाठी (रु .146.98 कोटी) तीनही कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 6]
टप्पा क्र. 6(सी) -या अंतर्गत एकूण 3 प्रकल्पांसाठी रु. 87.32 कोटी खर्चाच्या 2 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी तीनही प्रकल्पांच्या कामासाठी (रु .74.21 कोटी) 2 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 7]