श्री. प्रसाद तेजराम रेशमे

null

संचालक (प्रकल्प) (प्रभारी)

                    कार्यकारी संचालक श्री. प्रसाद तेजराम रेशमे यांनी ११ मार्च २०२५ पासून महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.

                    श्री. प्रसाद रेशमे हे मूळचे गोंदियाचे रहिवासी आहेत. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात श्री. प्रसाद रेशमे १९९७ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर, त्यांची थेट भरती प्रक्रियेद्वारे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, प्रादेशिक संचालक, कार्यकारी संचालक अशा विविध वरिष्ठ पदांसाठी निवड झाली आहे.

                    श्री. प्रसाद रेशमे यांनी नागपूर आणि जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता, नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक आणि कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम केले आहे.

                    महावितरणच्या कार्यकारी संचालक (पायाभूत सुविधा) म्हणून काम करताना श्री. प्रसाद रेशमे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली, दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजनेत उल्लेखनीय कामे केली आहेत.

                    महावितरणच्या वतीने ग्रामीण आणि शहरी भागात वीज यंत्रणा सक्षम आणि विस्तारित करण्यात, शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्परतेने नवीन वीज जोडणी प्रदान करण्यात श्री.प्रसाद रेशमे यांचे मोलाचे योगदान आहे.

Urja
Empowering the Consumer